Ad will apear here
Next
वारकरी हा केंद्रबिंदू मानून कार्य करणार : डॉ. अतुल भोसले
प्रीतिसंगम घाटावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करताना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अतुल भोसले.
कराड (सातारा) : ‘माझ्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी ही परमेश्वराचीच इच्छा असल्याने, मला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात वारकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि वारकऱ्यांना अधिकाधिक सेवासुविधा पुरविण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे,’ असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पाच जुलै रोजी कराड येथे केले. कराड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कराडकर मठ व वारकऱ्यांच्या वतीने डॉ. भोसले यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभात ते बोलत होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. भोसले म्हणाले, ‘विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे महत्त्व राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात आहे. या तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा मिळाव्यात आणि त्यांना सुलभतेने दर्शन मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. या दृष्टीने देवस्थानच्या प्रशासनाला गतिमानता मिळवून देण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे.’

‘पंढरपूर येथील नोंदणीकृत मठांना सुविधा पुरविण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच नवीन मठांची नोंदणी प्रक्रिया राबवून या मठांना ऊर्जितावस्था मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रशासनाच्या गतिमानतेबरोबरच आध्यात्मिक उन्नतीसाठी सांप्रदायिक व्यक्तींची सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे,’ असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
 
विठ्ठल देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर डॉ. भोसले यांचे कराडमध्ये विविध लोकप्रतिनिधी, संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगदीश जगताप, कराडकर मठाचे विश्वस्त मोहन चव्हाण यांनी डॉ. अतुल भोसले यांच्या निवडीचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. या वेळी मठाचे विश्वस्त दिलीपराव चव्हाण, विनायक विभुते, संभाजी सुतार, किसन जाधव यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. भोसले यांनी प्रीतिसंगम घाटावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील डॉ. भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, शिवाजी जाधव, निवास थोरात, संजय पाटील, गिरीश पाटील, सुजित मोरे, पांडुरंग होनमाने, अमोल गुरव, मनोज पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य शामबाला घोडके, प्रियांका ठावरे, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब निकम, अर्चना गायकवाड, शुभांगी पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, सुहास जगताप, किरण पाटील, बाळासाहेब यादव, महेश कांबळे, घनश्याम पेंढारकर, शिवराज इंगवले, प्रीतम यादव, विनोद भोसले, राहुल खराडे, सुरेश पाटील, प्रशांत मोहिते, माजी नगरसेवक महादेव पवार, मलकापूरचे नगरसेवक हणमंत जाधव, बाळासाहेब घाडगे, सुरेश खिलारे, कान्हा लाखे, कोल्हापूरचे माजी महापौर सुनील कदम, सुहास लटोरे, उद्योगपती शंकर पाटील, रणजित देशमुख, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगदीश पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब लाड, प्रसाद पाटील, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मोहनराव मोहिते, व्ही. के. मोहिते, बबनराव दमामे, सर्जेराव निकम, गजेंद्र पाटील, संजय शेवाळे, संजय शेटे, जयवंतराव जगताप, रेठरे बुद्रुकचे उपसरपंच हणमंत धर्मे, पैलवान धनाजी पाटील, द्वारकोजी पाटील, रेठरे खुर्दचे सरपंच धनाजी जाधव, उमेश मोहिते, किरण मुळे, रमेश मोहिते, शब्बीर शेख, समाधान चव्हाण, विजय शिंदे, रामकृष्ण वेताळ, मुकुंद चरेगांवकर, कृष्णा बँकेचे संचालक चंद्रहास जाधव, बाजार समितीचे संचालक दीपक जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी डॉ. अतुल भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZRXBE
Similar Posts
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड कराड (सातारा) : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि कराड येथील कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले   यांची निवड झाली आहे. राज्य सरकारने ही निवड जाहीर केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कराड, मलकापूर भागातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात २०१७-१८ गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी
‘कार्वेच्या विकासासाठी ४६ लाखांचा निधी’ कराड : कार्वे गावाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून ४६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर कार्वे येथील धानाई आडवाट रस्ता, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नवीन अंगणवाडी आणि धानाई देवस्थानाचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास, अशी विकासकामे येत्या काळात करण्यात
सदाभाऊ खोत घेणार कराड दक्षिण मतदारसंघ दत्तक कराड (सातारा) : ‘कराड दक्षिण मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, पुलांचे बांधकाम अशा विकासकामांसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि या भागाला भरघोस निधी मिळून येथील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी मी कराड दक्षिण

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language